नदीष्ट : माणूस आणि नदी यांचा समांतर प्रवास
'आपण नदीपासून दुरावत गेलो की आपलं उदात्तपणही हिरावून गेलं. माणसाच्या जगण्यातला निसर्गदत्त आणि निसर्गरूप विचार एवढीच सरळसोट असलेली संस्कृतीची व्याख्या आपण तोडून मरोडून आपल्या सोयीनुसार बदलून टाकली आणि संस्कृतीच्या नावाखाली वाटेल ते लादण्यास सुरुवात केली. विकास या शब्दाखाली सारेच निभावून नेण्याचा प्रयत्न केला...' नदीष्ट कादंबरीच्या सुरुवातीचा हा परिच्छेद. 'नदीष्ट' ही या वर्षी प्रकाशित झालेली कादंबरी. मुळात, कवीचा पिंड असलेल्या मनोज बोरगावकर यांच्या या कादंबरीने बोथट झालेल्या संवेदना जाग्या केल्या. हि कादंबरी माणसातलं माणूसपण जागं करते. ही कादंबरी म्हणजे एक दीर्घ संवेदनशील कविता आहे ! नदीच्या खोऱ्यात संस्कृती विकसित झाली. वाढली. रुजली. काळ बदलला तशी संस्कृती बदलत गेली. आता पैशांच्या लालचेपोटी लोक नदीतील वाळू उपसतात ही गोष्ट लेखकाला बेचैन करते. बोरगावकर यांना नदीचा गाभा हा स्त्रीच्या गर्भाशया सारखा वाटतो. जागतिकीकरणानंतर माणसातलं माणूसपण कुठेतरी हरवलं, हे हरवलेलं माणूसपण आपल्याला नदीष्टमध्ये गवसतं. आज आपण बर्याचदा आत्ममग्न आयुष्य जगतो. आपल्याला कुणाचं का...