हात्तिच्या, गांधी मरतच नाहीत !
आजपर्यंत इतिहासात अनेक क्रूर घटना घडल्या. त्याविषयी वाचलं, ऐकलं की, संवेदनशील लोक हळळतात. मात्र, त्या घटनांचं मूळ आपण शोधत नाही. विचार केल्यावर आपल्या लक्षात येईल की; ह्या ज्या क्रूर घटना घडल्या याच्या मुळाशी धर्म होता. स्वातंत्र्या नंतर देशातील पहिली क्रूर घटना कोणती असेल तर ती म्हणजे, राष्ट्रपित्याची हत्या. महात्मा गांधींनी जगाला सत्य, अहिंसेची शिकवण दिली, त्याच गांधीजींची हत्या झाली. धर्मरक्षक, देशभक्त म्हणून मिरवणाऱ्या हिंदुत्ववादी नथराम गोडसे याने गांधीजींवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. आता संघ परिवारातील लोकं नथुरामचं समर्थन करण्यासाठी सांगत असतात की, गांधी मुस्लिमधार्जिणे होते, त्यांनी फाळणी करून ५५ कोटी रुपये पाकिस्तानला दिले. म्हणून नथुरामने गांधीजींची हत्या केली. नथुराम खरे राष्ट्रभक्त होते. मात्र, माझ्यासारख्या सामान्य अक्कल असणाऱ्या माणसाला प्रश्न पडतो की, नथुराम देशभक्त होते तर त्यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काय प्रयत्न केले? कधी ब्रिटिश सरकार च्या विरोधात काही रोखठोक भूमिका घेतली का?असे अनेक प्रश्न आहेत मनात. आणि त्याची उत्तर ह्या तथाकथित धर्मरक्षकांकडे नाहीत, हे ठ...