वैकुंठगमन ही अंधश्रद्धाच !
काल दिनांक २३ मार्च च्या दैनिक लोकसत्ताच्या पहिल्या पानावर संत तुकाराम महाराज यांचा बीजोत्सव साजरा करतांनाचा भक्तांच्या जनसमुदायाचा एक फोटो छापण्यात आला. तुका बैसला विमानी । संत पाहती लोचनी ।। देव भावाचा भुकेला । तुका वैकुंठाशी गेला ।। ह्या ओळीचा संदर्भ म्हणून वापरल्या गेल्या. संत तुकाराम महाराज खरंच वैकुंठाला गेले का, हा प्रश्न आजही कित्येक वर्षानंतर बुद्धिजीवी लोक विचारतांना दिसतात. खरंतर संत तुकाराम महाराजांच्या मृत्युविषयी अनेक वाद आहेत. काही अभ्यासकांच्या मते त्यांचा मृत्यू हा खून आहे तर काही चरित्रकारांच्या मते तुकाराम महाराजांचा मृत्यू म्हणजे सदेह वैकुंठगमन ! अनेक चरित्रकारांनी तुकाराम महाराजांचे चरित्र लिहिलं. तुकाराम महाराजांचे वंशज असलेले श्रीधरमहाराज मोरे (देहूकर) यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं, 'इंद्रायणीकाठी तुकोबांचं कीर्तन सुरू होतं. त्यांनी सर्वांना 'आम्ही वैकुंठाला जात आहोत, तुम्ही माझ्याबरोबर वैकुंठाला चला' असं सांगितलं, तर प्राच्यविद्यापंडित डॉ आ ह साळुंखे, जन साहित्य परिषदेचे संस्थापक असलेले - राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे शिष्य सुदाम सावरकर यांनी त्यांच्या पुस्तकांमध्ये तुकाराम महाराजांची हत्या झाली, असे दावे केलेत. डॉ साळुंखे आणि सुदाम सावरकर या संशोधकांच्या पुस्तकांचा अभ्यास केल्यावर तुकाराम महाराजांची हत्या झाली, या निष्कर्षापर्यंत आपण येतो. आणि हत्या होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. कारण, संत तुकाराम महाराज यांच्या आधी होऊन गेलेल्या संतांनी केलेल्या प्रबोधनामुळे धार्मिक रूढी - परंपरा, वर्णभेद, जातिभेद कमी होऊ लागले. या संतांचे हे प्रबोधन कार्य वैदिक ब्राह्मणांच्या विचारांच्या विरोधात होते. त्यामुळे महात्मा बसवेश्वर, चक्रधर स्वामी यांची हत्या करण्यात आली. निवृत्ती महाराज ज्ञानेश्वर, सोपानदेव, मुक्ताबाई यांना तत्कालीन ब्राह्मण समाजाने छळल्याचे पुरावे आहेत. संत नामदेव आणि त्यांच्या कुटुंबीयांचा देखील घातपाती मृत्यू झाला. आधीचे हे संदर्भ लक्षात घेतले तर तुकाराम महाराजांची देखील हत्या झाली, हे उपलब्ध साधनसामुग्रीच्या आधारावर आपल्या हाती लागते.
तुकाराम महाराजांचा मृत्युचं गूढ इतिहास संशोधक उलगडतीलच. तुकाराम महाराजांचे वैकुंठ गमन झाले की ,मृत्यु ? हा माझा मुद्दाच नाहीये. मुद्दा हा आहे की, संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून धार्मिकतेचा- चमत्कारीकतेचा बुरखा फाडून प्रबोधनाचे काम केलं आणि आज देवभोळ्या लोकांसारखाच वर्तमानपत्रदेखील त्यांच्याच नावावर 'सदेह वैकुंठगमन' चा चमत्कार खपवू पाहतात. हा प्रकार धक्कादायक असून अंधश्रद्धा-चमत्कार यांना खतपाणी घालणारच आहे.
- कबीर उषा लक्ष्मण बोबडे
ईमेल - kabirbobade09@gmail. com

अतिशय मार्मिक मुद्दे आणि निरीक्षणे
ReplyDelete..
प्रसारमाध्यमे हे विवेक वाढवण्यासाठी असतात याचे भान सर्वच माध्यमांनी टाकून दिले आहे. विविध मुद्रित, इलेक्ट्रॉनिक आणि आता डिजिटल माध्यमांतील पसरणाऱ्या अंधश्रद्धा यांचा शोध घेऊन ते लोकांसमोर आणले पाहिजेत.
आपले प्रयत्न हे विविध कल्पक मार्गांनी चालू ठेवूया.
राहुल माने (creativityindian@Gmail.com)
वाह !
ReplyDeleteकबीर , छान लिहिल .
प्रबोधन ही काळाची गरज आहे. त्यासाठी आपल्यासारखे सद्सदविवेक बुध्दी जागृत ठेवून प्रबोधन करणे महत्वाचे आहे .
ReplyDeleteछान
ReplyDeleteतत्कालीन सर्व संतांचे अभंग वाचा त्यातुन कळेल की.
ReplyDelete