भाजपचा राष्ट्रवादाच्या आडून मताचा जोगवा !
राष्ट्रीयत्व हीच आमची प्रेरणा, सर्वसमावेशता हेच आमचे तत्वज्ञान आणि सुशासन हाच आमचा मंत्र अशी त्रिसूत्री व्यक्त करत भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. शिक्षण, रोजगार, हमी भाव, आरोग्य -सुविधा, दलित-आदिवासी सुविधा, स्मार्ट सिटी, गंगा जल शुद्धीकरण हे २०१४ च्या जाहीरनाम्यातील मुद्दे यावेळेसच्या भाजपच्या जाहीरनाम्यातून गायब ! शिवाय भाजपने २०१४ मध्ये दिलेल्या आश्वासनापैकी रोजगार, हमी भाव, महिलांची सुरक्षा हे मुद्दे या जाहीरनाम्यात आले नाहीत. तेच ते जुने मुद्दे या जाहीरनाम्यात आहेत. राम मंदिराचे आश्वासन देखील भाजप अनेक वर्षापासून देत आहे. काश्मीरशी संबंधित असलेले कलम ३७०, कलम ३५ अ रद्द करणे, घुसखोरी रोखणे, समान नागरी कायदा लागू करणे, नागरिकत्व दुरुस्ती चा कायदा करणे, राम मंदिर, दहशतवादाचा खात्मा करणे हे भाजपचे जुनेच मुद्दे या जाहीरनाम्यातून पुढे आलेत. राष्ट्रवाद आणि हिंदुत्वाशी संबंधित ह्या मुद्द्यांद्वारे धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. जाहीरनाम्यातील ठळक मुद्दे- १) राम मंदिर उभारणार २) समान नाग...