#नाट्य परीक्षण
अमन कि शांती... मानवी मुल्यांचा शोध
-कबीर बोबडे
राज्य नाट्य स्पर्धेत नगर केंद्रावर रविवारी पल्लवी पटवर्धन लिखित अमन की शांती हे नाटक कस्तुरबा महिला प्रतिष्ठान यांनी सादर केले. या नाटकाचे दिग्दर्शन देखील पल्लवी पटवर्धन यांनीच केले.
नाटक दोन अंकी. मात्र, हे दोन अंक म्हणजे दोन स्वतंत्र कथा. पहिल्या अंकात निरंजन आणि कावेरी यांची प्रेमकथा तर दुसर्या अंकात नासिर यांच्या मुलीची म्हणजे, रुहानची प्रेमकथा आणि तिचं नासिरचाच्या पासून दूर जाणं... या दोन्ही कथाच्ंया शेवटाचं कारण मात्र, एकच असतं. ते कारण म्हणजे, हिंसा. आणि ती हिंसा घडून येते निष्पाप- प्रेमावर श्रध्दा असणार्या रुहानच्या हातून. मानवी मुल्यांची होणारी पडझड हे नाटक अधोरेखित करते. स्वता:च्याही पल्याड एक जग असतं, इतरांचे डोळेही वाचता आले पाहिजे, अशा आशयाचे हे नाटक माणसांच्या जाणिवा व्यापक करते.
अमन कि शांती हे नाटक आताचं नाटक आहे. सततची नाटक हि मिथकाधारीत असतात आणि ते नाटकं सार्वकालिक जाणिवांचा वेध घेत असतात. तर आतीची नाटकं हे समकालीन वास्तवाला तडक प्रतिक्रीया देत असतात. अमन की शांती हे नाटक दुसर्या पठडीलं. या नाटकाची गुंफन बुध्दाच्या विचांराभोवती झालेली आहे.
या नाटकाची कथा अशी, रुहान ही कॉलेजवयीन तरुणी. आई बाबाची एकुलती एक मुलगी. तिच्या जन्माच्या वेळी तिची अम्मा अल्लाला प्यारी झालेली असते. नंतर तिचं सगळं तिचा अब्बू करतो. रुहान मोठी होते. कॉलेजला जाते. तिच्यासाठी रिश्ते सांगून यायला लागतात. अशातच रुहान परवेज याच्या प्रेमात पडते. त्याच्या प्रेमात आंकठ बुडुन जाते. तिचे हे प्रकरण चाच्याच्या कानावर येतं. तो रुहानच्या प्रेमप्रकाराची विचारपूस करतो. तिला विचारतो, तुझी परवेज शी फक्त मैत्री आहे न, परवेज सोबत दुसरं काही तर नाही ? या प्रश्नातून चाच्यांची मुलीप्रति असलेली काळजी व्यक्त होते. आता परवेज तिला रोज गल्लीतील बोळापर्यंत कॉलेजमधून घरी सोडत असतो. मोहल्यातील लोक वाईट-साईट बोलतात. चाच्या हे रुहानला सांगतो. रुहान अब्बू ला सांगते, मै परवेज से इतिंहाम मोहबत करती हू... हे ऐकून अबू हतबल होतो. शेवटी, लेकिच्या सुखपाई तो परवेजला घरी बोलवायला सांगतो. मात्र, मज्जीदमध्ये जातांना त्यांना परवेज मित्र-मैत्रिणी सोबत उभा दिसतो. तो काहीतरी वाईट बोलत होता. शिवाय, व्यसन करतांना दिसला. अब्बू तडक घरी आले. रुहानला हे सगळं सांगितलं. रुहान हे स्वीकारत नाही. तिला माहीत असते, परवेज नेकदिल आदमी है.. तो नशेबाज नाही. ती परवेजच्या बाजूने बोलते. शेवटी परवेजवर तिचं प्रेम असते. अब्बू तिला खूप समजावून सांगतात, दुसरा शोहर बघू, तुझ्यासाठी. मात्र, ती अट ठेवते, अब्बू अगर आप गलत साबीत निकले, तो मै परवेज से ही शादी करूँगी...
दुसर्या दिवशी परवेजचे सामान परत करण्याच्या बहाण्याने ती बाहेर अडते.... नंतर ती घरी परत येतच नाही.. चार दिवस होऊन जातात.. नंतर कळते की, बॉम्ब स्पोटात ती गेली. परवेझ हा जिहादी असतो. त्यानं रुहान ला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून ठेवलेलं असतं. तो सांगेल ते काम रुहान करायची. तिला माहीत नव्हतं, परवेज जिहादी असतो ते... त्यादिवशी घराबाहेर पडताना बॅगमध्ये जे सामान होत, त्यात बॉम्ब होते, ते तिला दुसर्या इसमकडे द्यायचे होते. मॉल समोर ते सामान देत असतांना त्याचा स्फोट झाला. त्यात रुहानचे निधन झाले.. तारीख असते 20 फेब्रुवारी 2005.
त्याच दिवशी अगदी शहरातील दंगलीत कावेरीचा देखील जीव गेलेला असतो. तिचे दोन्ही स्तन कापून तिच्यावर वार केलेले असतात. निरंजन मराठीचा प्राध्यापक. कावेरी कॉलेजवयीन तरुणी. निरंजनच्या प्रेमात पडते. निरंजन सुरुवातीला आढेवेढे घेतो. नंतर तिचं प्रेम स्वीकारतो. साखरपुडा ठरतो. शहरात दंगल सुरू होते. साखर पुडा असल्याने दोघेही खुश असतात. खरेदीसाठी परिवारासह शॉपिंग करायला मॉलमध्ये जातात. कावेरीला परदेशातल्या भावाचा कॉल येतो. मोबाईलला रेंज नसते म्हणून ती निरंजनच्या परवानगीने बाहेर जाते... बराच वेळ झाला, कावेरी आली नाही, म्हणून ते सगळे तिला शोधतात. बाहेर पडतात. बाहेर रक्ताचे डाग दिसतात. एक पुसटशी आकृती दिसते रक्ताच्या थारोळ्यात अडलेली. ती असते, कावेरी ! निरंजन टाहो फोडतो. हा सगळा घटनाक्रम फ्लश बँक मध्ये चालू असतो.. पहिल्या अंकात निरंजन आपली गोष्ट अब्बूला सांगतो. मोकळा होतो. दुसर्या अंकात निरंजन अब्बू विषयी जाणून घेतो. सुरूवातीला अब्बू म्हणजे, चाचा स्वतःची कहाणी सांगायला टाळतात. मात्र, नंतर चाचा बोलतात.
हे नाटक केवळ एका रात्रीचं आहे. निरंजन देहाने अस्तित्वान नसलेल्या मात्र, त्याच्या काळजात जिवंत असलेल्या, विचारात जिवंत असलेल्या कावेरीचा शोध घेत असतो. त्याला तिची ओढ लागलेली असते. कावेरी जावून खुप दिवस झाले. तरी तो अजूनही तिला विसरू शकला नाही. तिच्या आठवणीत तो जगत असतो. तिचा शोध घेतांना तो स्मशानापर्यंत पोहोचलेला असतो. तिथे चाच्या त्याला भेटतो. आणि जगण्याची दृष्टी त्याला मिळते. ख्वाब सी रहती है, कुछ यादे आखोमे... हे चाच्यांच वाक्य ऐकतांना MARGARET ATWOOD चे In the end, we'll all become stories.. हे वाक्य आठवले.
नाटक हे केवळ घटनांच नसतं तर ते घटना घडतांना घडणार्या मनातल्या घडामोडींच असतं, असं मकरंद देशपांडे यांनी एका ठिकाणी लिहून ठेवलं. या नाटकातही घडना घडतात. मात्र, त्या घटना रंगमंचावर घडतांना प्रेक्षकांच्या मनात घडणारे मंथन हे खरं नाटक आहे. आणि ते माणसाला बदलवतं. किंबहूना विचार करायला भाग पाडतं. तोच नाटकाचा उद्देश आहे. Art, freedom and creativity will change society faster than politics. हे Victor Punchik चेे विधान या नाटकाला लागू पडते. कारण, हे नाटक चिंतनात्मक आहे. प्रेम या महान मुल्याची रुजवात हे नाटक करते.
आणि सध्याची परिस्थितीत या नाटकाची गरज का आहे, तर Some sort of pressure must exist; the artist exists because the world is not perfect. Art would be useless if the world were perfect, as man wouldn’t look for harmony but would simply live in it. Art is born out of an ill-designed world. - Andrei Tarkovsky या विधानाचा मतितार्थ समजून घेणे गरजेचे आहे. तोच लेखकाचा हेतू असेल, यात तिळमात्र शंका नाही. या नाटकातील संवाद हे विचार करायला लावतात.
प्राजक्ता प्रभाकरने साकारलेली रुहान आणि कावेरी ह्या दोन्ही भूमिकेला तिने योग्य न्याय दिला. त्या दोन्ही स्वतंत्र व्यक्तिरेखा असून भूमिका साकारताना अभिनयात जराही साम्य दिसलं नाही, हे तिचं यश. तिचा अभिनय सशक्त तर होताच, शिवाय संवादफेक जबरदस्त होती. तिने हिंदी आणि मराठी भाषेचा जो लहेजा होता, तो उत्तम जपला. प्रचंड ताकतीने तिने दोन्ही भूमिका पेलल्या असून तिचा या भूमिका मधील अभिनय कायम लक्षात राहण्यासारखा आहे. तिने साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या मनावर कायमच्या कोरल्या गेल्यात.. योगेश वाघ यांनी बेचैनी -संवेदनशील - कवी मनाच्या निरंजन उत्तम साकारला. त्यांच्या चेहर्यावरील भाव संवादानुरूप होते. प्राजक्ता (कावेरी) आणि योगेश (निरंजन) यांची केमिस्ट्री मस्त जमली. चाच्या ची भूमिका करणारे श्रीराम गोरे यांचा अभिनय देखील उत्तमच होतो. वयोवृद्ध पिता आणि रखवलदार या दोन्ही भूमिका त्यांनी व्यवस्थित साकारल्या. त्यांचा मुद्राभिनयसुद्धा उत्तम होता. त्यांचा चेहर्यावर संयम आणि मोठा तर्जुबा दिसत होता. आणि तिच त्या पात्राची गरज होती. या सर्व कलाकारांच्या वाचिक आणि देहिक अभिनय कौशल्यामुळे नाटक एक उंचीवर गेले. या सगळ्या कलाकारांचा अभिनय नैसर्गिक होता.
अंध अवस्थेतील शेवटचा प्रसंग काळीज पिळवटून टाकतो.
रवी रहाणे यांची प्रकाश योजना उत्तम होती. लाईट्स ही नाटकाची जमेची बाजू ठरली. प्रकाश योजना करतांना रहाणे यांनी स्वतःची चमक दाखवली. रंगभूषा आणि वेशभूषा यांची जबाबदारी नाना मोरे आणि ऋतूगंधा पटवर्धन यांनी सांभाळली. रोहित सरोदे यांच्या संगीताने उत्तम वातावरण निर्मिती केली.

Comments
Post a Comment