#नाट्य परीक्षण अमन कि शांती... मानवी मुल्यांचा शोध -कबीर बोबडे राज्य नाट्य स्पर्धेत नगर केंद्रावर रविवारी पल्लवी पटवर्धन लिखित अमन की शांती हे नाटक कस्तुरबा महिला प्रतिष्ठान यांनी सादर केले. या नाटकाचे दिग्दर्शन देखील पल्लवी पटवर्धन यांनीच केले. नाटक दोन अंकी. मात्र, हे दोन अंक म्हणजे दोन स्वतंत्र कथा. पहिल्या अंकात निरंजन आणि कावेरी यांची प्रेमकथा तर दुसर्या अंकात नासिर यांच्या मुलीची म्हणजे, रुहानची प्रेमकथा आणि तिचं नासिरचाच्या पासून दूर जाणं... या दोन्ही कथाच्ंया शेवटाचं कारण मात्र, एकच असतं. ते कारण म्हणजे, हिंसा. आणि ती हिंसा घडून येते निष्पाप- प्रेमावर श्रध्दा असणार्या रुहानच्या हातून. मानवी मुल्यांची होणारी पडझड हे नाटक अधोरेखित करते. स्वता:च्याही पल्याड एक जग असतं, इतरांचे डोळेही वाचता आले पाहिजे, अशा आशयाचे हे नाटक माणसांच्या जाणिवा व्यापक करते. अमन कि शांती हे नाटक आताचं नाटक आहे. सततची नाटक हि मिथकाधारीत असतात आणि ते नाटकं सार्वकालिक जाणिवांचा वेध घेत असतात. तर आतीची नाटकं हे समकालीन वास्तवाला तडक प्रतिक्रीया देत असतात. अमन की शांती हे नाटक दुसर्या पठडीलं. या...