कलावंताला समाजाकडून अँप्रिशिएशन मागणाचा हक्क असतो !
कलावंताला समाजाकडून अँप्रिशिएशन मागणाचा हक्क असतो ! -सुमित्रा भावे (कराड येथील 'अभिरुची' फिल्म्स क्लब च्या वार्षिक महोत्सवानिमित्त दि. २९ फेब्रुवारी रोजी चित्रपट दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांची वर्षा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. शब्दांकन - कबीर उषा लक्ष्मण बोबडे) तुमचं औपचारिक शिक्षण हे राज्यशास्त्र, समाजशास्त्र या विषयात झालेलं आहे. चित्रपट निर्मिती ही खरंतर गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. यात अनेक विद्या शाखा, अनेक तांत्रिक बाबी येतात. मात्र सिनेमाचं कुठलेही औपचारिक शिक्षण घेतलेलं नसतांना देखील तुम्ही चित्रपट केले. आम्हाला याचा समजलं कारण म्हणजे - 'उपजत प्रतिभा' ! तुम्ही त्याच्याविषयी काय सांगाल ? - नमस्कार पहिल्यांदाच तुमच्या सगळ्यांची माफी मागते. कारण माझं बोलणं ऐकतांना तुम्हाला खडबडीत रस्त्यावरून चालल्यासारखं वाटणार आहे. माझा आवाज सुमधुर वगैरे नाहीये. तो खराब झालेला आहे. चकचकीत रस्त्यावरून पडल्यापेक्षा आम्हाला खडबडीत रस्त्यावरून चालायला आवडेल ! - मी समाजशास्त्राचा अभ्यास केला. राज्यशास्त्राचा अभ्यास केला आहे ; पण त्याहीपेक्षा जास्त मी समाजकार्याचा ...