Posts

वाचकांची पसंती

नाइन्टीन नाइन्टी : कलंदर माणसाचं जगणं !

Image
    सचिन कुंडलकर या प्रतिभावान दिग्दर्शकाचं 'नाइनटीन नाईन्टी' हे पुस्तक वाचलं. प्रस्तावनेऐवजी  ‘नाइन्टीन नाइन्टी’ याच नावाच्या दीर्घ लेखाने या पुस्तकाची सुरुवात होते. या ठिकाणी कुंडलकर लिहितात की  ‘प्रत्येक माणूस हा एका दशकाने घडवला जातो, ओळखला जातो’. कुंडलकर यांच्यासाठी हे काम १९९०च्या दशकाने केलं. मात्र, हे पुस्तक म्हणजे केवळ गतकाळाचे दस्तऐवजीकरण नाही. तर एक सृजनशील कलावंतांच्या विविधांगी जगण्याचं आणि आगळ्या वेगळ्या जीवनाचं एक मनोज्ञ दर्शन आहे. अष्टपैलू गुण असलेला हा माणूस मनसोक्त जगला, चित्रपटात रमला, नाटकात रंगला, साहित्यात वावरला, कधी कधी जग फिरला... आणि याच नव्वदच्या दशकाने सचिन कुंडलकर यांना सिनेमाशी जोडलं, पुण्याची वेस ओलांडून परदेशात नेलं.... तिथे नवीन भाषा शिकले ज्याद्वारे त्यांचं जगणं अधिकाधिक समृद्ध होत गेलं. परदेश फिरल्याने नवीन संस्कृतीशी - तिथल्या माणसांशी त्यांचा जवळून संबंध आल्याने आपलं जग आणि अवकाश किती छोटेखानी, मर्यादित  आणि संकुचित स्वरूपाचे आहे याची त्यांना जाणीव झाली. या जाणीवेने त्यांना एक मनस्वी कलावंत आणि एक संवेदनशील माणूस म्हणून अधिक ...

अपडेट्स मिळवा...

आपल्या ‘व्हॉटस्ॲप’वर नियमितपणे लेख मिळविण्यासाठी 7588079124 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून, त्यावर आम्हाला ‘हॅलो’ असा मॅसेज पाठवा.

'भणंग वर्तमानाची वेदना : माझ्या हयातीचा दाखला'

Image
'भणंग वर्तमानाची वेदना : माझ्या हयातीचा दाखला' - कबीर उषा लक्ष्मण बोबडे --------------------------------------------------- मी पेरतो पेनाच्या तिफणीने कागदाची जमीन फुलांची माणसे आणि माणसांची फुले व्हावीत म्हणून... असं माणसाचं गाणं गाणारी माणूसकेंद्री कविता  कवी डॉ विशाल इंगोले यांचा "माझ्या हयातीचा दाखला" या काव्यसंग्रहात वाचली. या कविता संग्रहातील कविता मधून सर्वसामान्यांच्या जीवनातील प्रश्न मुखर होतात. कवी आजूबाजूच्या भोवतलाला आपल्या कवितेचा विषय बनवतो, त्यामुळे आपल्या समाजाचं दाहक वास्तव, प्रतिबिंब आपल्याला कवितेत दिसतं. विषणन्न जाणिवांची ही कविता समकालीन ज्वलंत प्रश्नांवर बोट ठेऊन समाजातील उपेक्षित, दुर्लक्षित, घटकांच्या व्यथा-वेदना मांडते. पुरोगामी, विद्रोही आणि प्रबोधनात्मक विचारांची ही कविता विचारप्रवण आणि  अंतर्मुख करून काळीज ढवळून काढते. सामाजिक संदर्भ उकलून दाखवणारी ही कविता आक्रस्ताळी होत नाही, ती सुबोधपणे व्यक्त होते, मनाला भिडते. विशाल इंगोले यांचा जीवनानुभव समृद्ध असल्याने साहजिकच त्यांच्या कवितेचा   पैस व्यापक आहे. इंगोले यांची कविता थेट आजच्...

कलावंताला समाजाकडून अँप्रिशिएशन मागणाचा हक्क असतो !

Image
कलावंताला समाजाकडून अँप्रिशिएशन मागणाचा हक्क असतो ! -सुमित्रा भावे  (कराड येथील 'अभिरुची' फिल्म्स क्लब च्या वार्षिक महोत्सवानिमित्त दि. २९ फेब्रुवारी रोजी चित्रपट दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांची वर्षा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. शब्दांकन - कबीर उषा लक्ष्मण बोबडे)  तुमचं औपचारिक शिक्षण हे राज्यशास्त्र, समाजशास्त्र या विषयात झालेलं आहे. चित्रपट निर्मिती ही खरंतर गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. यात अनेक विद्या शाखा, अनेक तांत्रिक बाबी येतात.  मात्र सिनेमाचं कुठलेही औपचारिक शिक्षण घेतलेलं नसतांना देखील तुम्ही चित्रपट केले. आम्हाला याचा समजलं कारण म्हणजे - 'उपजत प्रतिभा' ! तुम्ही त्याच्याविषयी काय सांगाल ?  -  नमस्कार पहिल्यांदाच तुमच्या सगळ्यांची माफी मागते. कारण माझं बोलणं ऐकतांना तुम्हाला खडबडीत रस्त्यावरून चालल्यासारखं वाटणार आहे.  माझा आवाज सुमधुर वगैरे नाहीये. तो खराब झालेला आहे. चकचकीत रस्त्यावरून पडल्यापेक्षा आम्हाला खडबडीत रस्त्यावरून चालायला आवडेल ! - मी समाजशास्त्राचा अभ्यास केला. राज्यशास्त्राचा अभ्यास केला आहे ; पण त्याहीपेक्षा जास्त मी समाजकार्याचा ...

अश्लील उद्योग : चौकटी बाहेरचा प्रयत्न !

Image
अश्लील उद्योग : चौकटी बाहेरचा प्रयत्न ! 'अश्लील उद्योग मित्र मंडळ' हा आलोक राजवाडे दिग्दर्शित आणि धर्मकीर्ती सुमंत लिखित सिनेमा वास्तव आणि फॅन्टसी यांचं अजब मिश्रण असलेला सिनेमा आहे.  त्यामुळे हा सिनेमा एक आगळा वेगळा प्रयोगशील प्रयत्न आहे. नेहमीच्या पारंपारिक चित्रपट विषयांपेक्षा वेगळ्या धाटणीचा, चौकटी बाहेरच्या विषयाचा हा चित्रपट असून श्लील - अश्लील हा वाद निरर्थक असून या चित्रपटाचा विचार कलात्मक औचित्याच्या दृष्टीने, आशयाच्या दृष्टीने, आणि कलात्मक सत्याच्या दृष्टीने होणे गरजेचे आहे, असे वाटते. सेक्स आणि प्रेम या दोन्ही गोष्टीचं त्या-त्या जागी असणारं महत्त्व अधोरेखित करणारा अत्यंत वेगळ्या पद्धतीचा हा सिनेमा आहे. आपल्याकडे काही प्रयोगशिल दिग्दर्शक वेगळे विषय मांडतात, त्यामुळे समीक्षकांनी सम्यक बुद्धीने समीक्षा करणे गरजेचे आहे. मात्र, जे सिनेमात नाहीच, यावरच बरेच चित्रपट समीक्षक बोलतात, आणि जे चित्रपटात आहे, त्याची समीक्षा राहते बाजूला ! शिवाय, उणीवा दाखवणं, चुकांवर बोट ठेवून त्या लक्षात आणून देणं, यात गैर नाही, पण कलाकृतीला चुकीचा शेरा मारणे योग्य नाही. तसं करणं हे कोतेपणाचे लक...

'चाकोरी' :३२ वर्षांनंतर

Image
'चाकोरी' ३२ वर्षानंतर  'चाकोरी' हा १९८८ साली सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी दिग्दर्शित केलेला लघुपट. चाकोरी म्हणजे चौकट. चाकोरी म्हणजे वर्तुळ. चाकोरी म्हणजे मर्यादा. चाकोरी म्हणजे, व्याकरण ! मात्र, आयुष्य वर्तुळात जगायला, चौकोनात जगायला आयुष्य भूमिती नाही, आयुष्य  भूमिका आहे ! अशी शिकवण हा लघुपट देतो. 'मुक्तता आणि जाणिवांची जाणीव' करून देतो. आपल्या भारतीय समाजव्यवस्थेमध्ये जशी जातीची उतरंड आहे, तशीच उतरंड 'स्त्री-पुरुष' नात्यात आहे.  या स्त्री-पुरुष असमानतेमुळे कोणत्याही क्षेत्राततच नव्हे, तर अगदी चार भिंतीच्या आत सुध्दा कोणत्याही गोष्टीसाठी स्त्रियांना डावलून पुरूषांना प्राथमिकता  दिली जाते. स्त्रियांची गुणवत्ता नाकारल्या जाते, हे आपलं दाहक सामाजिक वास्तव आहे, आणि नेमकं तेच वास्तव चाकोरीतून अधोरेखित केलं. ग्रामीण भागातल्या एका तरुण परित्यकत्या स्त्रीच्या जगण्याची चाकोरी, तिचं आयुष्य 'चाकोरी' या लघुपटामध्ये अतिशय कलात्मक पद्धतीने मांडले आहे.  आजही गाव खेड्यात जेव्हा  एखादी गोष्ट करायची असेल आणि मुलगा आणि मुलगी यापैकी एकाच्याच प...
Image
#नाट्य परीक्षण अमन कि शांती... मानवी मुल्यांचा शोध -कबीर बोबडे राज्य नाट्य स्पर्धेत नगर केंद्रावर रविवारी पल्लवी पटवर्धन लिखित अमन की शांती हे नाटक कस्तुरबा महिला प्रतिष्ठान यांनी सादर केले. या नाटकाचे दिग्दर्शन देखील पल्लवी पटवर्धन यांनीच केले. नाटक दोन अंकी. मात्र, हे दोन अंक म्हणजे दोन स्वतंत्र कथा. पहिल्या अंकात निरंजन आणि कावेरी यांची प्रेमकथा तर दुसर्‍या अंकात नासिर यांच्या मुलीची म्हणजे, रुहानची प्रेमकथा आणि तिचं नासिरचाच्या पासून दूर जाणं... या दोन्ही कथाच्ंया शेवटाचं कारण मात्र, एकच असतं. ते कारण म्हणजे, हिंसा. आणि ती हिंसा घडून येते निष्पाप- प्रेमावर श्रध्दा असणार्‍या रुहानच्या हातून. मानवी मुल्यांची होणारी पडझड हे नाटक अधोरेखित करते. स्वता:च्याही पल्याड एक जग असतं, इतरांचे डोळेही वाचता आले पाहिजे, अशा आशयाचे हे नाटक माणसांच्या जाणिवा व्यापक करते. अमन कि शांती हे नाटक आताचं नाटक आहे. सततची नाटक हि मिथकाधारीत असतात आणि ते नाटकं सार्वकालिक जाणिवांचा वेध घेत असतात. तर आतीची नाटकं हे समकालीन वास्तवाला तडक प्रतिक्रीया देत असतात. अमन की शांती हे नाटक दुसर्‍या पठडीलं. या...
Image
#नाट्य परीक्षण- *'अरे देवा'... देव हरवला...!* *कबीर बोबडे* राज्य संचलनालय आयोजित 59 व्या हौशी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत शनिवारी नटेश्‍वर कला व क्रीडा मंडळाने नगर केंद्रावर महेश केळुसकर लिखित आणि राजेंद्र क्षीरसागर दिग्दर्शित अरे देवा हे दोन अंकी नाटक सादर केले. कलाकारांचा उत्तम अभिनय,  तंत्रज्ञांनी दिलेली अचूक साथ आणि दिग्दर्शकाचे भन्नाट कौशल्य यामुळे नाटक एका वेगळ्या उंचीवर पोहोचले. श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन टोकाच्या दोन गोष्टी... दोन ध्रुव... दोन टोकं... मात्र, या दोन गोष्टीतील सीमारेषा अत्यंत पुसट, धूसर असते. श्रद्धावान वा आस्तिक माणूस कधी नकळत श्रद्धेचा नावाखाली अंधश्रद्धेलाच जवळ करून बसतो. जीवनाचे सत्य नेमके काय आहे, याचा शोध घेण्यात त्याचा बराचसा वेळ खर्ची होतो. एकवेळ अशी येते की ही लढाईच नको असे त्याला वाटते; परंतु तेव्हाच एखादा आशेचा किरणही त्याला दिसतो. ते नाटक म्हणजे 'अरे देवा !' मानवी जीवनात असंख्य मायामोह असतात आणि या मोहमायावर ज्याला विजय मिळवता आला तो जिंकला, अशा आशयाचे हे नाटक होते. अरे देवा या नाटकात 'देव' नावाचे अदृश्‍य ...

प्रतिक्रियांचे स्वागत

'अवताल भवताल' या ब्लॉगवर प्रकाशित झालेली मते ही लेखिकेची स्वतंत्र मते असून आपल्या प्रतिक्रिया ऐकायला आम्ही नेहमीच उत्सुक आहोत. कौतुक असो वा तक्रार स्वागत आहे.


ईमेल– kabirbobade09@gmail.com